हॅलो क्राईम
Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”
हॅलो जनता, न्युज भुसावळ : (Fraud)
भुसावळ येथील रेल्वे ठेकेदार गौरव मनवानी यांची लोखंडी सळई पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल ४०.९६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत मिश्रा याने स्वतःला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने लोखंडी सळईचा माल पुरवठा करणार असल्याचे सांगून मनवानी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन एनएफटीद्वारे पैसे उकळले. मात्र, पैसे मिळूनही माल न देता, मिश्रा याने आणखी पैशांची मागणी केली. यामुळे गौरव मनवानी यांनी अखेर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.
Raver Crime : जानोरी जंगलात सावदा पोलिसांची धडक कारवाई: चार गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त