Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”
हॅलो जनता, नाशिक : Dainik Deshdoot
दैनिक ‘देशदूत’चे (Dainik Deshdoot) संस्थापक आणि ख्यातनाम उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते.
नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत देवकिसन सारडा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.
देवकिसन सारडा यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सिन्नर व्यापारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, जळगाव जिल्हा सहकारी बँक, नाशिक औद्योगिक सहकारी वसाहत (नाईस), नाशिक औद्योगिक कारखानदार संघ (निमा), ऑस्टीम, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांवर महत्त्वपूर्ण पदे भूषवली. चतुरस्त्र, निष्ठावंत आणि कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या सारडा यांच्या निधनाने नाशिकच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत शोककळा पसरली आहे.
Ganja Farming : “नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त!”
Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी