New Year Celebration : जळगाव : नववर्ष स्वागताला तयार, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर पोलिसांची करडी नजर
हॅलो जनता न्युज, जळगाव :
नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) तरुणाईसह शहरातील नागरिक सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरच्या जल्लोषात मद्यपान करून वाहन चालवल्यास ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कठोर कारवाई होणार आहे. यामध्ये वाहन चालकाला १० ते ११ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊन वाहनही जप्त करण्यात येईल. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी
नववर्षाच्या (New Year Celebration) पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहने तपासण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस तैनात असून, फिक्स पॉइंट्सवर तळीरामांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.
मद्यपान आणि वेगाने वाहन चालवल्यास कठोर कारवाई
‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवल्यास ‘ब्रेथ अॅनालायझर’च्या सहाय्याने तपासणी होणार आहे. मद्यपान आढळल्यास दंड आणि वाहन जप्तीची कारवाई केली जाईल. तसेच, सुसाट वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवरही कडक लक्ष ठेवले जाणार आहे.
पोलिसांनी ३० डिसेंबरच्या रात्रीपासूनच विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नववर्षाच्या उत्सवाचा आनंद घेताना नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्युज : जळगाव जिल्ह्यात आयोजित अजय अतुल यांचा कार्यक्रम रद्द, “हे” आहे कारण
Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”