हॅलो राजकारण

Rupali Chakankar : पीडीत महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर महिला आयोग कारवाई करणार

हॅलो जनता न्युज, मुंबई – Rupali Chakankar

पीडीत महिलेच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या राज्यव्यापी दौर्‍यावर आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून त्या आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यांच्यासमवेत प्रत्येक जिल्हयात जनसुनावणी घेत आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयाचा दौरा आटोपून त्या आज कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांविषयक तक्रारींची स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत जनसुनावणी घेतली. यासाठी ४ पॅनेल तयार करण्यात आले होते. आयोगापुढं तक्रारी मांडण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेक महिलांना त्यांच्यावरील अन्यायाची कहाणी सांगताना अश्रू आवरले नाहीत. सर्व तक्रारींची रुपाली चाकणकर यांनी व्यक्तीशः दखल घेतली आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना या तक्रारींचं निवारण करून पीडीत महिलेला न्याय द्यावा, असे आदेश दिलेत.

यावेळी मार्गदर्शन करताना चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पीडीत महिलेचा तक्रार अर्ज म्हणजे एक कागद न समजता तिचं संपूर्ण आयुष्य समजा आणि तिला न्याय देण्याची भूमिका प्रशासनानं पार पाडावी, असं नमुद केलं. महिलांविषयक तक्रारींकडं दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवरसुध्दा प्रसंगी महिला आयोग कारवाई करण्यास कचरणार नाही, असा स्पष्ट इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी

Ajay-Atul live Show : नववर्षाच्या स्वागतासाठी अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंबरला भव्य लाईव्ह कार्यक्रम!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button