⁠हॅलो शेतकरी

कृषी विभागाची मोठी कारवाई, ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले…..

जळगाव दि. १९ (हॅलो जनता न्युज)

खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगाम सुरू झाला असून कृषी विभाग देखील अलर्ट झाला आहे. जळगाव कृषी विभागातर्फे बनावट बी बियाणे, कीटकनाशके आणि खते यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून पथके तयार करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील वाल्मिक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड,मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५% WP हे शेतीपयोगी बुरशीनाशक एम ४५ नावाने अधिकृत विक्री होत असते.

सदर कंपनीचा लोगो,ब्रँड नेम,समान रंग संगती असणारे पाकिटे तयार करून बनावट एम ४५ बुरशीनाशक शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी तयार करण्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असून जिल्हा गुण नियंत्रण पथकातील अधिकारी विकास बोरसे आणि जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार यांनी तात्काळ पथक तयार करून

विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.संशयित आरोपी यांच्या वाल्मिक नगर भुसावळ येथे पोलिस पथक व गुणनियंत्रण पथकातील सदस्य यांनी छापा टाकला असता विना परवाना बुरशीनाशक उत्पादन,साठवणूक करत असल्याचे आढळून आले. सदर छाप्यात बनावट एम ४५ बुरशीनाशक पाकिटे १०१०,बुरशीनाशक म्हणून वाल पुट्टी च्या बॅग,सिलिंग मशीन, बनावट पाकिटे इ. एकूण ३८७३६०/-रकमेचा मुद्देमाल सापडला आहे.

संशयित आरोपी परवाना व उत्पादन विषयी कागदपत्रे व पुरवठादार यांच्या विषयी माहिती विचारली असता ते देऊ शकले नाही. सदर संशयित बनावट साठा जप्त करून नमुने घेण्यात आले असून बाजारपेठ पोलिस स्टेशन,भुसावळ येथे अधिकृत उत्पादक प्रदीप झा यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास श्री मंगेश जाधव पोलिस उपनिरीक्षक भुसावळ हे करीत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

ब्रेकिंग : वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला, एक तलाठी गंभीर जखमी…

साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

मंगेश 2.0 पर्वाची झंझावाती सुरुवात, हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button