विधानसभा २०२४

ब्रेकिंग : भुसावळ मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तगडा उमेदवार भेटला, विद्यमान आमदारांचे टेन्शन वाढले…

हॅलो जनता न्युज (भुसावळ) –

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीकडून नेमके कोण निवडणूक लढणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भुसावळ शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश मानवतकर महाविकास आघाडीकडून भुसावळ विधानसभेसाठी संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय आणि सामाजिक कार्यातून भुसावळच्या जनतेची सेवा डॉ. राजेश मानवतकर करत आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून डॉ. राजेश मानवतकरांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी जनतेतून होत असल्याचे समोर आले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वे मध्ये देखील डॉ. मानवतकर हे आघाडीवर असल्याने त्यांनाच भुसावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पक्षाकडून त्यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

काँग्रेस पाचोऱ्याच्या जागेवर ठाम, मुंबईत मोठी खलबते सुरू…

भुसावळच्या आमदारांचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, भुसावळ तालुक्यातील अनेक गावे पोकरा योजनेपासून वंचित

Big Breaking : जामनेरात दिलीप खोडपे ऐवजी माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button