संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्लास्टिक मुक्त संक्रांत; पर्यावरणपूरक वाणाचे वाटप
हॅलो जनता न्युज :
“परंपरेला निसर्गाची जोड – प्लास्टिकमुक्त संक्रांत!” या संदेशासोबत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण कदम उचलला आहे. शाळेने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात प्लास्टिक वस्तूंच्या ऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वाण म्हणून वितरित केल्या.
सालाबादातील या खास कार्यक्रमात महिलांना कापडी पिशव्यांचे वितरण करून शाळेने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश दिला. हळदी-कुंकुच्या कार्यक्रमात महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना उपशिक्षिका स्वाती नाईक आणि शितल कोळी मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभात करिश्मा वंजारी यांनी प्रास्ताविक केले, तर सुवर्णा अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी कार्यक्रमात सहभागी महिलांना आव्हान केले की, प्लास्टिकचा वापर कमी करावा, ज्यामुळे पर्यावरणावर होणारी हानी टाळता येईल.
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय