महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील महिंदळे या छोट्याशा गावाचे भूमिपुत्र आणि जनमानसात लोकप्रिय अधिकारी सुदाम अमरसिंग परदेशी यांची नुकतीच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या या नियुक्तीबाबत संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदाम परदेशी यांनी यापूर्वी अंधेरी, मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहून उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी बजावली होती. त्यांनी आतापर्यंत कराड (सातारा), जुन्नर (पुणे), ठाणे, पनवेल आणि अंधेरी मुंबई येथे उल्लेखनीय सेवा दिली असून, त्यांची शिस्तप्रियता, जनतेशी आपुलकी आणि न्यायनिष्ठ वृत्ती यामुळे ते प्रशासनात एक आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या पदोन्नतीबाबत भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, कन्नड तसेच जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील परदेशी, मिणा आणि राजपुत समाज यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निमित्ताने त्यांच्या भडगाव येथील वलवाडी शेतशिवारातील फार्महाऊसवर निसर्गरम्य वातावरणात परदेशी समाज व मिञ परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन मनःपूर्वक सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, परदेशी, मिणा, राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, तंटामुक्ती जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद परदेशी, भडगाव तालुका अध्यक्ष अशोक परदेशी, चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान परदेशी, सेवानिवृत्त अभियंता प्रकाश आण्णा परदेशी, तसेच आकाश परदेशी व इतर समाजबांधव आणि मिञ परिवार उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण
🛑ब्रेकिंग: शेतकऱ्यांना मोठा फटका, रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढणार…




