भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील


हॅलो जनता न्यूज, (विशेष लेख) – भडगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत शांतपणे पण प्रभावीपणे आपला ठसा उमटवणारे नाव म्हणजे युवराज आबा पाटील. या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचालीकडे आणि नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणूक विजयाकडे मागे वळून पाहणे औचित्याचे ठरते.
राजकारणात गाजावाजा न करता पडद्यामागून सूत्र हलवणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊन समन्वय साधणे ही युवराज पाटील यांची खास ओळख आहे. याच राजकीय हुशारीचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच पार पडलेली भडगाव नगरपरिषदेची निवडणूक.
निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर युवराज पाटील यांनी बारकाईने परिस्थितीचा अभ्यास केला. उमेदवारांची निवड, प्रभागनिहाय गणित, कार्यकर्त्यांचे मनोबल, स्थानिक प्रश्न आणि मतदारांचा कल या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत त्यांनी पडद्यामागून प्रभावी नियोजन केले. त्याचा परिणाम म्हणजे शिवसेनेला मिळालेला ऐतिहासिक विजय.
भडगाव नगरपरिषदेच्या एकूण २४ जागांपैकी तब्बल १९ जागा आणि एक अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा अशा एकूण २० जागा जिंकत आणि नगराध्यक्षा पदावर आपला झेंडा रोवत शिवसेनेने भडगावच्या राजकारणात इतिहास निर्माण केला. या विजयाचे सर्व नियोजन आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले असले, तरी त्या नियोजनाला यशस्वी अंमलबजावणीची धार देण्याचे काम युवराज पाटील यांनी केले, हे राजकीय वर्तुळात मान्य केले जात आहे.
आमदार किशोर पाटील यांच्यानंतर निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यावर लक्ष ठेवत, संभाव्य अडचणी ओळखून त्यावर योग्य उपाययोजना करत युवराज पाटील यांनी भडगाव नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याची किमया साधली. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, नेत्यांमधील समन्वय आणि विरोधकांच्या हालचालींवर ठेवलेली करडी नजर यामुळेच हा विजय शक्य झाला.
आज युवराज आबा पाटील हे केवळ एक नाव न राहता, भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जात आहेत. कमी बोलून अधिक परिणाम साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. आगामी काळात तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार, यात शंका नाही.
अशा या दूरदृष्टी असलेल्या, राजकीय चातुर्याने निर्णय घेणाऱ्या आणि शिवसेनेला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या युवराज आबा पाटील पुढील काळात देखील अशीच भूमिका बजावतील यात शंका नाही.
लेखक – सचिन गोसावी (संचालक, हॅलो जनता न्यूज)
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात बिबट्याची दहशत; ऊस तोडणीदरम्यान तीन पिल्ले आढळली..
🚨 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्या कोमल वाढे प्रभाग क्र. ६ मधून जळगाव मनपा निवडणुकीच्या रिंगणात
🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर…




