भडगाव तालुक्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद
हॅलो जनता, प्रतिनिधी –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना मोठे आमिष दाखवले जात आहे. मात्र कुणीही बळी न पडता योग्य वेळेची वाट पाहून भ्रष्ट लोकप्रतिनिधीला धडा शिकवा ! असे आवाहन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले. त्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत बोलत होत्या.
पाचोरा तालुक्यात शेतकरी शिवसंवाद यात्रेला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभल्यानंतर आजपासून ही यात्रा भडगाव तालुक्यात सुरू झाली. यात सकाळच्या सत्रामध्ये कोठली, निंभोरा, देव्हारी आणि कनाशी या गावांमध्ये यात्रा पोहचल्यानंतर अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला. प्रत्येक गावातील महापुरूषांचे पुतळे व स्मारकांना त्यांनी अभिवादन केले. कनाशी येथे शेतकरी शिवसंवाद यात्रा पोहचताच श्री चक्रधर स्वामी देवस्थानामध्ये ताईंनी पूजन करून आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी वार्तालाप केला.
प्रत्येक गावात ताईंचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण झाले. गावातील प्रत्येक घराला भेट दिल्यानंतर ताईंनी ग्रामस्थांशी वार्तालाप करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात ग्रामीण भागातील भयाण वास्तव हे समोर आले. यात कोठली येथील ग्रामस्थांनी वाळू तस्करीसह परिसरातील रस्ते व शिवरस्त्यांची दुर्दशा, स्मशानभूमीच्या रस्त्याची दयनीय अवस्था आदींसह बंधारा हवा अशी मागणी केली. तर गावातील अवैध दारूंबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. देव्हारी येथील ग्रामस्थांनी परिसरातील कोणताच रस्ता चांगला नसल्याची तक्रार केली. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरूस्ती तसेच गावाला कमान हवी अशी मागणी त्यांनी केली. आपण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.
याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांनी मतदारसंघातील सध्याचा कारभार हा अतिशय भ्रष्ट असून याला बदलण्याची सुवर्णसंधी ही निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार असल्याचे सांगितले. आपल्यावर दबाव टाकून वा आमीष टाकून गळाला लावण्याचे प्रयत्न झाले तरी याला आपण बळी न पडता त्यांना धडा शिकवा असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान, येथे पळासखेडेच्या माजी सरपंच व ग्रा. पं सदस्य आशाबाई गोपाळ पाटील यांनी शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यांचे वैशाली सुर्यवंशी यांनी स्वागत केले.
आजच्या शिवसंवाद यात्रेत कोठली येथील दीपक आधार पाटील, कारभारी पाटील, गोरख पाटील, पांडुरंग पाटील, अशोक पाटील, भीकन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शत्रुघ्न पाटील, भागवत पाटील, पंडित पाटील, लोटन पाटील, विनायक पाटील, धुडकू पाटील, संभाजी कोळी, लक्ष्मण पाटील, संभाजी आधार पाटील, शिवाजी पाटील, गणेश पाटील, रवींद्र पाटील व अशोक पाटील तर निंभोरा येथील गोरखदादा, साहेबराव पाटील, गौतम मोरे, बाबाजी पाटील, दीपक बाविस्कर, विकास पाटील, रवींद्र पाटील, विश्वास पाटील, हिराजी पाटील, शांताराम पाटील, महेंद्र बाविस्कर, हिरामण नाना, सरपंच प्रकाश पाटील, गोकुळ पाटील, डिगंबर पाटील, परमेश्वर पाटील, संतोष पाटील, रवींद्र पाटील आदींची तर कनाशी येथील भाऊसाहेब पाटील, पियुष पाटील, सुरेश पाटील, सतीश पाटील, रमेश पाटील, नथ्थू मोहिते, संजय पाटील, रावसाहेब जिभाऊ, प्रभाकर देवरे, गोविंद पाटील, महेंद्र पाटील, राजीव पुजारी, सोनू पाटील, बापू पुजारी, शिवाजी पाटील, शाम पुजारी, महेंद्र अशोक पाटील, नागराज मोरे, संभाजी पाटील, प्रदीप मोरे, नाना सरदार, उमेश पाटील, श्रीराम सरदार, अनिल पाटील, मांगू न्हावी, दगा पाटील, अनुप पाटील, संजय पाटील, शैलेश पाटील, मयूर पाटील, अजय पाटील, युवराज बेलदार व काकाजी पुजारी आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
दुपारच्या सत्रात बोदर्डे, लोण, बोरनार व घुसर्डी येथे शिवसंवाद यात्रा काढण्यात आली. यात बोदर्डे येथील शाम पाटील, संजय पाटील, देविदास पाटील, संजय जगन्नाथ पाटील, शुभम पाटील, रवींद्र पाटील, शामकांत पाटील, दिलीप पाटील सरपंच, संतोष पाटील आदी यात्रेत सहभागी झालेत. येथील ग्रामस्थांनी शेतरस्त्यांची समस्या मांडली. तसेच बोदर्डे ते भडगाव रस्त्याची दुर्दशा, बोदर्डे ते बोरनार शिवरस्ता आदी मागण्या केल्या. घुसर्डी येथील जयदीप पाटील, नवल परदेशी, प्रताप परदेशी, भागचंद पाटील, दिप परदेशी, राजचंद परदेशी, योगेश परदेशी, भीमसिंग पाटील, शिवसिंग पाटील व मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या.
आजच्या यात्रेत अरूण पाटील, गणेश परदेशी, मनोहर चौधरी, दीपक पाटील, शंकर मारवाडी, माधव जगताप, चेतन देवरे, चेतन पाटील, रतन परदेशी, योजना पाटील, उषा परदेशी, मच्छींद्र आबा, पप्पू दादा, राजू मोरे, सुभाष महाराज, विकास जाधव, जगन जाधव, राजाराम जाधव, शरद पाटील, बद्री जाधव, विजय साळुंखे, भाऊसाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील, शाम सर, गोरखदादा, शाम पाटील, संत्ूा पाटील, माधव जगताप, चेतन रंगराव पाटील, राजू पाटील, दत्तू मांडोळे, बाळू पाटील, नवल राजपूत, संकेत सोमवंशी, यश बिरारी, उमेश पाटील, विक्की पाटील, पृथ्वीराज पाटील, मनीषा पाटील, पप्पू पाटील, सत्यजीत पाटील, कल्पना पाटील, निता भांडारकर, गायत्री पाटील, सुरेखा वाघ, बेबाबाई पाटील, माधुरी पाटील, बेबी राठोड मीरा जैसवाल आदी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या..
Big Breaking: भुसावळ मधून महाविकास आघाडीकडून दिनेश भोळे यांचे नाव चर्चेत?
Jain sports academy : जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन याला सुवर्ण