हॅलो राजकारण

भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र परदेशी, व्हाईस चेअरमनपदी हिरामण पाटोळे यांची बिनविरोध निवड.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील 

भडगाव : शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र लालचंद परदेशी यांची, तर व्हाईस चेअरमनपदी हिरामण सुखदेव पाटोळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यापूर्वी चेअरमनपदाचा भैय्यासाहेब पाटील व व्हाईस चेअरमनपदाचा देविदास माळी यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्या रिक्त जागांसाठीच सदर निवड कार्यक्रम घेण्यात आला.

नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन हिरामण पाटोळे यांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्यासह संघाचे संचालक मंडळ व उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रतापराव पाटील, जयवंत पाटील, खुमानसिंग पाटील, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, गुलाब पाटील, रायचंद परदेशी, शुभांगी पाटील, योजना पाटील, भिमराव पाटील, नागेश वाघ, युवराज पाटील, सुधाकर पाटील, डॉ. प्रमोद पाटील, महेंद्र ततार, जगन भोई, नगराज पाटील, सरदार परदेशी, कैलास पाटील, रमेश पाटील, विशाल परदेशी, भुतेसिंग परदेशी, उदयसिंग परदेशी, जितेंद्र परदेशी, दिनेश परदेशी वडजी, विष्णू भोसले, विठ्ठल पाटील, पप्पू पाटील, डी. डी. पाटील आदी मान्यवर तसेच संघाचे मॅनेजर सुरेश पाटील, लिपिक साहेबराव पाटील, दिलीप नरवाडे, विशाल भोई आदी कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माजी चेअरमन भैय्यासाहेब पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button