विधानसभा २०२४हॅलो राजकारण

ब्रेकिंग: डॉ. संभाजी राजे पाटील उद्या पारोळा एरंडोल मतदारसंघातून दाखल करणार उमेदवारी अर्ज..

हॅलो जनता न्यूज, पारोळा

उद्या दि. २८ रोजी एरंडोल पारोळा मतदार संघातून डॉ. संभाजी राजे पाटील हे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत एरंडोल येथील तहसील कार्यालयात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. संभाजी राजे पाटील हे सामाजिक काम करत असल्याने जनतेशी त्यांची नाळ जोडली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा…

सकाळी ११:०० वाजता असंख्य कार्यकर्तेच्या उपस्थितीत पारोळा येथुन श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन सरळ बाजार पेठ मार्गे छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक,राणी लक्ष्मीबाई स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, या ठिकाणीं महापुरुषांना अभिवादन करून हजारो कार्यकर्त्यासह एरंडोल कडे रवाना होणार आहेत. तसेच एरंडोल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, अमळनेर दरवाजा,परदेशी गल्ली,भगवा चौक,छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक, मरिमाता म्हसावद नाका,वीर एकलव्य स्मारक,मार्गे तहसील कार्यालय येथे कार्यकर्तेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

तरी मतदार संघातील बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपली उपस्थिती दयावी असे एरंडोल पारोळा भडगांव कासोदा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना डॉ. संभाजीराजे पाटील यांच्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

Girish Mahajan : आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

भाजपचे तालुका प्रमुख करणार बंडखोरी, “या” दिवशी अमोल शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button