निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन, वैद्यकिय क्षेत्रात शोककळा…
हॅलो जनता, जळगाव – येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी (वय 79) यांचे अल्पशा आजाराने सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ क्षितिज चौधरी, सून डॉ रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी सौ राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत.
डॉ. चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन रुग्ण सेवा केली असून डॉ. चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्या पिठा चे ते सिनेट सदस्य, महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची अंतिम यात्रा आज दुपारी 3:30 वाजता राहते घर, प्रताप नगर येथून निघून जैन हिल्स, शिरसोली रोड येथे जाईल व तिथे अंतिम संस्कार होतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील
भडगाव तालुक्यातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, किशोर आप्पाची ताकद वाढली…
ब्रेकिंग न्यूज : वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट