हॅलो डॉक्टर

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती

हॅलो जनता (प्रतिनिधी) : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची बदली झाली असून आता महाराष्ट्र शासनाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा आदेश गुरुवार दि. २० जून रोजी काढला आहे.

डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली झाल्यानंतर अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक व घसाशास्त्र विभागातील प्रा. डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधिष्ठातापदाची सूत्रे हाती दिली होती. त्यानंतर दीड वर्ष डॉ. गिरीश ठाकूर यांनी अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळला. जळगाव येथील महाविद्यालय व रुग्णालयाची स्थिती बदलवून त्यांनी रुग्णसेवेसाठी अनेक चांगले निर्णय घेतले.

आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून महाराष्ट्रातील काही अधिष्ठातांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार दि. २० रोजी निघाले. त्यामध्ये डॉ. गिरीश ठाकूर यांना अलिबाग येथील मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. तर जळगाव येथील अधिष्ठातापदी परभणी येथील शासकीय वैद्यकीय विभागाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव शंकर जाधव यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button