चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ
हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर विरवाडे रस्त्याने आपल्या विरवाडे गावाकडे बहिणी निघाल्या होत्या. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोठ्या बारा वर्षीय बहिणीला आरोपीने एका शेतात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारुन टाकले. मात्र, ही घटना तिच्यासोबतच्या तीन लहान बहिणींनी हे पाहिल्यानंतर सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली.
त्यानंतर गावकरी तिचा शोध घेऊ लागले. याच रस्त्यावर गुळ मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळील पाटचारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीडिता विवस्त्र सापडली. घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला. पोलिस पाटील आणि सरपंच यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेचा पंचानामा करून मुलीचा मृतदेह रुग्णालयात नेला.
चोपडा : काही तासांतच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. चोपडा-आडगाव रस्त्यावर तो पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर हे घटनास्थळी दाखल झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पुरामुळे बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन
चांगली विकास कामे केल्याने गावाने केली आमदारांची लाडू तुला, कुठे घडला हा प्रकार….