पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिनावल वारकरी भक्त निवास मंडपाचे भव्य लोकार्पण

हॅलो जनता न्यूज, श्रीक्षेत्र पंढरपूर – पवित्र आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या अंतर्गत वै. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती, चिनावल यांच्या वारकरी भक्त निवास मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर श्री. जनार्दन हरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे उपस्थित होते.
“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” च्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्यात भक्ती, सेवा आणि परंपरेचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला. वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी, त्यांच्या सेवेसाठी उभा राहिलेला हा भक्त निवास मंडप हे वारकरी संस्कृतीच्या संवर्धनाचे एक मोठे पाऊल ठरले आहे. या मंगल प्रसंगी परिसरातील सर्व संतगण, चिनावल समितीचे सन्माननीय विश्वस्त मंडळ, स्थानिक मान्यवर, अधिकारी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले हजारो वारकरी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या या भक्त निवासामुळे वारकऱ्यांना आता अधिक चांगल्या सोयीसुविधा मिळणार असून, यामुळे त्यांच्या आषाढी वारीतील अनुभव अधिक समाधानकारक ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात, पहाटे पुलाचे बॅरिकेट तोडून बस नदीत कोसळली.
💥 ब्रेकिंग गोळीबार प्रकरण भोवले, पाचोरा पोलीस निरीक्षकांची बदली
पाचोरा गोळीबार, पोलीस अधीक्षकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम….