ऐनपूर महाविद्यालयात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या प्रसंगी जे.पी. टेक फाऊंडेशनचे अध्यक्ष जयंत पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच पंचायत समिती रावेरचे गटविकास अधिकारी विनोद मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
रामदास महाजन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कौशल्यासोबत मेहनतीची जोड देत समाजाभिमुख राहण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. अंजने यांनी महिला सक्षमीकरणासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांनी त्यातून कौशल्य आत्मसात करून स्वतःचा आणि देशाचा विकास साधावा, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक शालिनी मंजुळे, रोशन बगाडे, प्रा. साईनाथ उमरीवाड, प्रा. कोमल सुतार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत पाटील, श्रेयस पाटील, हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.
ही कार्यशाळा पुढील महिनाभर सुरू राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.



