उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या कला पाहून दादा आणि भाऊ भारावले….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी): जळगाव शहरातील सोशल मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ‘उडान’ दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी दिव्यांग मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच केंद्राला आर्थिक व सामाजिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘उडान’च्या संचालिका हर्षाली चौधरी, समुपदेशक स्वाती ढाके व समाजसेवक धनराज कासट यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुरेशदादा जैन व अशोकभाऊ जैन यांनी केंद्रातील क्लाऊड किचन व हस्तकलेच्या वस्तू विभागाला भेट दिली. मुलांनी प्रेमाने केलेले स्वागत, त्यानंतर सादर केलेला डान्स यामुळे उपस्थित सर्वच भारावले.
यावेळी सुरेशदादा जैन यांनी ‘उडान’ला आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच या केंद्राची जी वास्तू आहे, तिचे नुतनीकरण जैन इरिगेशन सिस्टिम्स आणि भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘उडान’मध्ये सध्या ११० हून अधिक दिव्यांग मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या शिस्तीप्रमाणे रोज प्रार्थना, योगाभ्यास, खेळ, तसेच हस्तकलेच्या वस्तू बनविणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे दिवाळी निमित्ताने २७ हून अधिक प्रकारच्या आकर्षक वस्तू ही मुले स्वतः तयार करतात. या वस्तूंना समाजातील मान्यवरांकडून मोठी मागणी असून, विक्रीद्वारे मुलांचा आत्मसन्मान वाढतो.
उडान केंद्रातील आनंदमयी क्षण
मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यांवर उमटलेले हास्य व त्यांच्या आत्मविश्वासाने भारावलेले क्षण अविस्मरणीय ठरले. “या मुलांचे प्रयत्न, त्यांची जिद्द आणि समाजाकडून मिळालेले बळ हेच ‘उडान’च्या कार्याला खरी दिशा देणारे आहे,” असे सूर या भेटीत उमटले. या भेटीमुळे ‘उडान’ केंद्रातील कार्याला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक व सामाजिक बळ मिळाले असून, दिव्यांग मुलांच्या भविष्यासाठी ही भेट एक प्रेरणादायी टप्पा ठरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम
🚨 ब्रेकिंग : मत चोरीविरोधात जळगावात काँग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सुरूवात
🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, कोणत्या जिल्ह्याला किती निधी पहा….