ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…
हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई –
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा सामंतांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना, उदय सामंत यांनी सांगितले की, कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या विचारांवर आम्ही काम करतोय. फक्त गद्दार…गद्दार बोलून होत नाही, कामही करावं लागत असल्याचा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला. ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सामंत यांनी म्हटले. शिवसेना कोणाची मतदारांनी सांगितले असून आम्हाला महाराष्ट्रात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट करताना म्हटले की, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. काल निकाल लागल्यानंतर रात्रीपासूनच काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंकडे सध्या 20 आमदार आहेत. त्यातील 2-3 आमदार सोडून बाकी सगळे आमदार आमच्याकडे येतील असा दावा सामंत यांनी केला.
ठाकरेंचे कोणते आमदार शिंदेंकडे येणार?
उदय सामंत यांनी सांगितले की, महायुतीला मोठं यश मिळाले. पाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी असतो. त्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले आमदार यांच्याकडे येतील. या आमदारांना कधी आणि कसा पक्ष प्रवेश द्यायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. तूर्तास आमदारांची नावे जाहीर करणार नसून वेळ आल्यावर आमदारांची नावे समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी आता बडबड बंद करावी, अन्यथा उरलेले आमदारही आमच्याकडे येतील असा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या…