ब्रेकिंग न्युज : जळगाव जिल्ह्यात आयोजित अजय अतुल यांचा कार्यक्रम रद्द, “हे” आहे कारण
हॅलो जनता न्युज, जळगाव –
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये गारखेडा पर्यटन प्रकल्प हा पर्यटन विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला आहे. या प्रकल्पाची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने येत्या ३१ डिसेंबरला अजय – अतुल यांचा भव्य दिव्य लाईव्ह ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. मात्र देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दु:खद निधन झाल्याने देशभरात शोककळा परसली असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील पर्यटनस्थळी आयोजित प्रसिद्ध भारतीय संगीतकार अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बुधवारी रात्री निधन झाल्याने केंद्र सरकारतर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय दुखवटा काळात कुठलाही शासकीय, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत नसल्याने गारखेडा येथील कार्यक्रम देखील रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात लवकरच येत्या काळात होणार असून त्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
Monsoon Update : जळगाव जिल्ह्यात उद्याही पावसाचा यलो अलर्ट ; नागरिकांनी सतर्क राहावे
Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”
Accident : “भरधाव दुचाकीची धडक: जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी यांची प्रकृती गंभीर”