जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….
हॅलो जनता, प्रतिनिधी – संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असून जामनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये शौचास गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने जवळच्या केळीच्या बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी तिच्या परिवारासह राहते. परिवार मजुरी काम करून उदरनिर्वाह करत असल्याची माहीती मिळाली आहे . बुधवारी दि. २८ रोजी सदर पीडित अल्पवयीन मुलगी ही शौचालयास गेली असताना गावातच राहणारा संशयित आरोपी आरोपी त्याने तिला जबरदस्ती केळीच्या बागेत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सदर मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यावर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे करीत आहेत.
सदर घटनेतील संशयित आरोपी याला अटक करण्यात आली असल्या बाबतची माहीती मिळाली असून अखेरची माहीती हाती येत अस्थान त्याला न्यायालयीन कामकाजासाठी नेण्यात आले होते. न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील
ब्रेकिंग : नेपाळ अपघातातील मयत यात्रेकरूंचे मृतदेह घेवून अँब्युलन्स भुसावळ कडे रवाना ….
Vaishali Suryawanshi : पाचोऱ्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आक्रमक