माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….
हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असून याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे जळगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहरात लावलेल्या बॅनर्स ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितुपक्षात सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीआधी अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खोटी आश्वासने देवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचे श्रद्धा घालुया अशा आशयाचे हे बॅनर जळगाव शहरातील अनेक चौकात आणि दर्शनी भागात लागले आहेत.
या बॅनर्स वर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा फोटो आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप कडून १०० दिवसात जळगाव बदलवू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जनता ही रस्त्यावरील खड्डे, इतर समस्यांनी त्रस्त असून या समस्यांना वाचा फोडण्याचे काम या बॅनर्स मधून सुरू असल्याने जळगाव शहरात या बॅनर्स ची जोरदार चर्चा सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, रोहिणी खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी….
तब्बल ८० हजार शेतकऱ्यांची ई – केवायसी नाही, कापूस सोयाबीन पिकाच्या अर्थ सहाय्यापासून राहणार वंचित….
पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन….