हॅलो राजकारण

जास्तीत जास्त विकास कामे कशी करावी हे किशोर आप्पा कडून शिकावे लागेल – मंत्री दादा भुसे

बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात मंत्री दादा भुसे यांनी केले मार्गदर्शन...

हॅलो जनता, प्रतिनिधी – आज मतदार संघाचा आढावा घेतला असून आमदार किशोर आप्पा हे पहिली परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाले आहेत असे वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी पाचोरा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक, मंत्री दादा भुसे यांनी पाचोरा भडगाव मतदार संघाचा आढावा घेतला आहे. मंत्री दादा भुसे हे पाचोरा भडगाव मतदार संघाच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी निरीक्षक म्हणून बूथ प्रमुख आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदार संघाच्या बाबतीत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच पाचोरा – भडगाव मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

पाचोरा शहरातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या शिवालय सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवायचे असेल तर बूथ प्रमुखांनी चांगले काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आगामी विधानसभा निवडणुकीत ५० हजारांचा लीड असेल, पदाधिकाऱ्यांच्या विश्वास

यावेळी विधानसभा निवडणुकीत संपुर्ण महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प देखील या शिबिरात त्यांनी बोलून दाखवत राज्य सरकारच्या योजनांविषयी माहिती दिली तर आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक देखील करत गाफील न राहता आपण केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवा म्हणजे आपल्याला कुणीच हरवू शकत नाही असे मार्गदर्शन मंत्री भुसे यांनी सर्वांना केले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांना आगामी निवडणुकीत हॅट्रिक करत पन्नास हजारांपेक्षा अधिक लीड मिळवून देण्याचा संकल्प केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

Kulbhushan Patil : कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना होणार अटक, काय आहे नेमके प्रकरण…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button