हॅलो राजकारण

चांगली विकास कामे केल्याने गावाने केली आमदारांची लाडू तुला, कुठे घडला हा प्रकार….

हॅलो जनता, प्रतिनिधी – लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने चांगली काम केली तर लोकप्रतिनिधींचे गावातील नागरिक खूप कौतुक करत असतात. असाच काहीसा प्रकार पाचोरा भडगाव मतदार संघातील वाणेगाव या गावात घडला आहे. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि मतदारांच्या भेटी घेण्यासाठी विकास दौरा हा कार्यक्रम हाती घेतला असून या माध्यमातून दररोज मतदार संघातील गावात जाऊन त्या ठिकाणी केलेल्या विकास कामांचा आढावा आणि नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत.

आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात विक्रमी विकास कामे केली असून जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक विकास काम झालेला मतदार संघ म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाची ओळख आहे. प्रत्येक गावामध्ये नागरिकांच्या गरजा ओळखून आमदारांनी विकास कामे केली आहे. त्याच माध्यमातून आमदारांचा विकास दौरा पाचोरा तालुक्यातील वाणेगाव या ठिकाणी गेला असता आमदारांनी केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांनी चक्क लाडू सोबत तराजूतुला करत भगवान श्रीकृष्ण मंदिरात आरती चे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी समस्त गावकरी उपस्थित होते.

गावातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवणे आणि गावाचा विकास करणे हे माझे काम आहे, मात्र तरी देखील गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमामुळे भारावून गेलो. यापुढे देखील अशीच माझ्या हातून लोकांची सेवा घडो हेच देवा कडे मागणे आहे.

– आमदार किशोर पाटील

इतर महत्त्वाच्या बातम्या…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पुरामुळे बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

शेतकऱ्यासाठी बैलच ठरला ‘काळ’, पोळ्याची तयारी करताना बैल उधळला

पुरणपोळीसह धान्याची रास खाऊ घालत सर्जाराजाप्रती कृतज्ञता, गोदावरी कुटूंबियांतर्फे बैल पोळा सण उत्साहात साजरा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group