Yogi Adityanath : या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
हॅलो जनता (सांगली) – एक भारत आणि श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. जगात भारताचे महत्व वाढल आहे. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या असून आंतकवाद संपला, अस मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत योगी बोलत होते. जाती आणि धर्मामध्ये भेद निर्माण करून राजकारण करणारी काँग्रेस ही या निवडणुकीनंतर इतिहास जमा होणार आहे असंही योगी यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी आहे, धार्मिक सांस्कृतिक सामाजिक वारसा असणारा महाराष्ट्र आहे. या सर्व गुणाची सांगड घालून, एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (Yogi Adityanath) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत म्हणजेच रामराज्य आहे.
यावेळी खासदार संजय काका पाटील, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, मंत्री गुलाबराव पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहित अन्य मान्यवर उपस्थित होते.
VBA Jalgaon : जळगावात ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जुंपली
Bus Accident : एसटी बस आणि ट्रक चा भीषण अपघात, अपघातात ६ प्रवासी जखमी तर …..