हॅलो राजकारण

Vaishali Suryawanshi : दडपशाहीला घाबरू नका आणि ईमान विकू नका : मुफ्ती हारून नदवी

वैशालीताई सुर्यवंशींसाठी धडाकेबाज सभा; हजारोंची उपस्थिती

हॅलो जनता, पाचोरा- भडगाव (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या आधी काहीही आमीष वा दडपण आले तरी आपले ईमान विकू नका, पाचोरा विधानसभा मतदारसंघात क्रांतीची मशाल प्रज्वलीत करून वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांना विजयी करा ! असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा वरिष्ठ पत्रकार मुफ्ती हारून नदवी यांनी केले. ते वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी पाचोरा व भडगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांच्या पाठीशी विविध धर्म व जाती समुदाय खंबीरपणे उभा राहिल्याचे दिसून येत आहे. यात अल्पसंख्यांक समाजातुनही ताईंना पाठींबा मिळत आहे. या अनुषंगाने पाचोरा व भडगावातील अल्पसंख्यांक समुदायाच्या परिसरात काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, तथा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यात त्यांनी अतिशय ओजस्वी पध्दतीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी मुफ्ती हारून नदवी म्हणाले की, पाचोरा-भडगाव शहरातील दहशतीचे वातावरण मोडून काढण्यासाठी रणरागिणी झाशीच्या राणीसारखे लढणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी यांची आपल्याला गरज आहे. ताई आमदार बनल्यास आपल्या अडी-अडचणीत त्या मदत करणार नाही अशी अफवा पसरवत आहेत. तथापि, वैशालीताई खूप खंबीर असून त्यांच्या नावातूनच आपले खूप प्रश्न सुटतील अशी खात्री नागरिकांनी बाळगावी. निवडणुकीच्या आधी आदल्या रात्री उमेदवारांना खूप आमिषे येणार आहेत. पाकिटातून पैसे येतील. मात्र पाचशे, हजार वा दोन हजारासाठी आपले ईमान न विकता वैशालीताई सुर्यवंशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जिंकून आणावे असे आवाहन मुफ्ती नदवी यांनी याप्रसंगी केले. तर, महायुती सरकार हे जनतेला तोडण्याचे काम करत असली तरी महाविकास आघाडी हे लोकांना जोडण्याचे काम करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. त्यांनी याप्रसंगी विविध प्रकारच्या शेरोशायरीच्या माध्यमातून उपस्थितांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.

या दोन्ही सभांच्या प्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या दोन्ही सभांना हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर शहरात प्रचाराचा शुभारंभ, विकास कामे पाहून जनतेत प्रचंड उत्साह…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button