हॅलो सामाजिक⁠हॅलो शेतकरी

निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”

हॅलो जनता, प्रतिनिधी –

पाचोरा तालुक्यात कृषी विभागाच्या योजना आणि शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे कर्तव्य दक्ष तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश निना जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद या ठिकाणी बदली झालेली आहे. त्या कारणाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री. रमेश निना जाधव यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी श्री. रमेश निना जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचे तोंड भरून कौतुक केले.

या कार्यक्रमांमध्ये श्री भालेराव विस्तार कृषी अधिकारी पाचोरा हे अध्यक्षस्थानी होते. तसेच श्री बोथरा अध्यक्ष कृषी निविष्ठा वितरक संघ पाचोरा हे प्रमुख पाहुणे , श्री. एस पी बोरसे मंडळ कृषी अधिकारी नगरदेवळा, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सचिन भैरव, श्री प्रवीण रामराव पाटील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, श्री ज्ञानेश्वर पाटील जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शेतकरी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

श्री. रमेश निना जाधव यांचे ऋणनिर्देशपर भाषण…

 

14/9/2021 पासून ते आजतागायत एकूण 3 वर्षे 8 महिने आपल्या पाचोरा तालुक्यात अविरत काम करतांना मला खुप खूप आनंद झाल.आज दिनांक 31/5/2025 रोजी बदलीने जळगाव (जामोद), बुलढाणा येथे झाली त्या निमित्त् थोडे असे कि, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, प्रगतीची कास धरणारी व विनयशील देखील. त्याचबरोबर सर्व पक्षीय पदाधिकारी व सर्व वृत्त पत्रकार बंधू, संपर्कात आलेले व्यापारी वर्ग, व्यावसायिक वर्ग यांसह, सर्व शासकिय यंत्रणांकडून मला भरभरून साथ-प्रतिसाद मिळाला. या कालावधीत तालुक्यात अनेक शेतकर्‍यांसंबंधीत विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध कृषि क्षेत्रातील कंपन्या, प्रामुख्याने निर्मल सीड कंपनी, ईफको, आरसीएफ, विद्यापीठ यांच्यासोबत विविध शेतकरीभिमुख उपक्रम राबविण्याची मिळालेली अविस्मरणीय संधी, त्याला तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देणारी प्रसार माध्यमे, प्रगतशील शेतकरी,विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्यासोबतची जवळीकता मनसुकावणारी होती.

त्यात सर्वार्थाने ओतप्रोत भरलेले सर्व गुण संपन्न,शेतकर्‍यांसंबंधीत संवेदनशील, जनतेप्रती आस्था तर भुमीशी एकनिष्ठ कर्तव्यापलिकडील कार्य करणारे ,जिव्हाळ्याने भिसलेले, प्रेमळ पण तेवढेच शिस्तबद्ध व शिस्तप्रिय,विकासपुरुष कार्यसम्राट – आमदार महोदय, यांनी नेहमीच दिलेले अद्वितीय प्रेरणा व उत्साह कधीही विसरणार नाहीत असे नियोजन व संयोजनाचे उत्कृष्ट वक्ते व मार्गदर्शक हे नेहमीच स्पृहणीय व आदर्शवत राहतील,तर, त्याचबरोबर ईतर सर्वच राजकिय पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्यासोबत व परस्परातील जनहिताचा समन्वयातून आकाराला आलेले कार्य हे सुद्धा अनुकरणीय होते…विशेष म्हणजेच अभ्यासक व कर्तव्याधिष्ठीत मा.प्रांत व मा.तहसीलदार साहेब यांची साथ म्हणजेच कामकाजाबाबत प्रेरणास्रोत… . …..

त्यातच आपल्या सारखे मनापासून आमच्यावर प्रेम करणारे व जनहित जोपासण्याची आपली वृत्ती हि,सतत आमहास प्रेरणादायक व बोधक ठरेल,असे आपण मला निरंतर स्मरणात राहाल.आपण आम्हास नेहमणीच समजून घेतले व सहकार्य केले या …आपल्या सहकार्याबद्दल खुप खूप धन्यवाद!!!

रमेश जाधव, तालुका कृषि अधिकारी, पाचोरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button