Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!
हॅलो जनता, जळगाव : Swadhar Yojana
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी (Swadhar Yojana) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने याबाबतची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केला होता, पण वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयंचलित पद्धतीने स्वाधार योजनेसाठी पात्र मानले जातील.
तसेच, या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी स्वतंत्रपणे नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा.
Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”
Ganja Farming : “नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त!”