Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
हॅलो जनता न्युज, बीड
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने बुधवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात याबाबतचे आश्वासन दिले होते, त्यानुसार या एसआयटीचे नेतृत्व पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली हे करणार आहेत.
एसआयटीमध्ये बीड सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केज पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, केज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि पोलिस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेला २४ दिवस पूर्ण झाले तरी मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक करण्यात पोलिस, सीआयडी आणि प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे एसआयटी नियुक्ती केल्याने तपासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक
Beed : “सरपंच हत्या प्रकरण : फरार आरोपींना अटक नाही तर महाराष्ट्र बंद – मनोज जरांगे यांचा इशारा