PM Narendra Modi : फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबद्दल चर्चा कंटाळवाणी ; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला
हॅलो जनता न्युज, नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एकदा पुन्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की, “फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांच्या समस्यांबद्दल चर्चा कंटाळवाणी वाटेल. काही नेत्यांना गरिबांच्या झोपडीत जाऊन फक्त फोटोसेशन करणेच सोयीचे ठरते. देशाने पाच दशकं ‘गरिबी हटाव’चे नारे ऐकले, मात्र परिणाम काय?,” असा सवाल मोदींनी केला.
ते पुढे म्हणाले, “दिल्लीमधून एक रुपया निघायला १५ पैसे गरिबांच्या हातात पोहोचत. परंतु आमच्या सरकारने खोट्या घोषणांपासून दूर राहून खरा विकास केला आहे. बचत आणि विकास हाच आमचा सरकारचा मॉडेल आहे. गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोक गरिबीच्या दाय्यातून बाहेर आले आहेत.”
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढे सांगितले, “आम्ही ३ लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवले आणि १० कोटी बनावट लाभार्थ्यांची नावे हटवली. आता, प्रत्येक गरीबाच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. पूर्वी दिल्लीतून एक रुपया निघला तरी गरिबांपर्यंत फक्त १५ पैसे पोहोचत होते, पण आता थेट त्यांचं बँक खातं भरलं जातं. आमचं उद्दिष्ट प्रत्येक घरात नळानं पाणी पोहोचवण्याचं आहे.”
AI in agriculture : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार
अष्टविनायक कॉलनीत गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य सोहळा, आमदार अमोल पाटील यांचा सत्कार
Bhusawal Crime : भुसावळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल !