Pachora : पाचोरा महाविद्यालयाच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे खडकदेवळा खुर्द येथे उत्साहात समारोप
हॅलो जनता न्युज, पाचोरा :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पाचोरा (Pachora) तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकदेवळा खु.||, ता. पाचोरा येथे दि. 24 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले होते. दि. 30 डिसेंबर रोजी ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चा समारोप समारंभ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
त्यांनी आपल्या मनोगतात NEP – 2020 च्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी सामोरे जात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत हाती घेतले पाहिजे. आपण ही श्रमसंस्काराची शिदोरी आपल्यासोबत नेऊन तिचा सदुपयोग केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी स्वयंसेवकांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची खूप मोठी भूमिका आहे. आम्ही आमच्याकडून खूप देण्याचा प्रयत्न करतो; परंतु आपण त्याचा लाभ आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे असा विचार मांडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी स्वयंसेवकांना सात दिवसात मिळालेले संस्कार जीवनभर कामी येतील. त्या संस्काराच्या आधारावरच आपण भविष्याचा सुजाण व कर्तव्यलक्षी नागरिक व्हाल असे मत व्यक्त केले. दादासाहेब सुदाम वाघ यांनी गावाच्यावतीने या श्रमसंस्कार शिबिराला खूप मदत दिल्याचे सांगत स्वयंसेवकांनी खऱ्या अर्थाने स्वच्छता मोहीम, पथनाट्य व जनजागृती रॅलीच्या माध्यमातून स्वच्छता व निसर्गाचे महत्त्व पटवून दिले असे मत व्यक्त केले.
खडकदेवळाचे पोलीस पाटील तुकाराम तेली यांनी स्वयंसेवकांची स्तुती करताना या सर्व स्वयंसेवकांनी आमच्या गावात स्वच्छतेचे खूप मोठे काम केले असे सांगितले. त्यासोबत राजेशाहू वारुळे, कोमल पाटील, वैष्णवी शिंदे, कल्याणी सोनवणे, चेतना हिरे या स्वयंसेवकांनी सात दिवसाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातील आपले अनुभव कथन केले.
या शिबिरात उत्स्फूर्त वक्तृत्व, संगीत खुर्ची, गीतगायन व कथाकथन अशा वेगवेगळ्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी घेण्यात आल्या. यावेळी शिवदास पाटील, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र शेलार, जि. प. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनिफ शेख शरीफ, सदस्य बापूराव पाटील, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, रासेयो विभागीय समन्वयक डॉ. वाय. बी. पुरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. वळवी, प्रा. प्रदीप देसले, प्रा. एन. वाय. पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. मनोज पवार, सह. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल भोसले, प्रा. शुभम राजपूत, प्रा. राम ठोंबरे, महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. जयश्री वर्मा-वाघ, कार्यालयीन अधिकारी ऋषिकेश ठाकूर, देशमुख सर, संतोष महाजन, घन:श्याम करोसिया, प्रविण खेडकर, यश सूर्यवंशी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक-स्वयंसेविका जि. प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
समारोप सत्राचे प्रास्ताविक प्रा. आर. बी. वळवी, सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले तर आभार डॉ. क्रांती सोनवणे यांनी केले. ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर’ यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक-स्वयंसेविका यांनी खूप परिश्रम घेतले.
Jalgaon : वातावरण बदलामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले ; बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर
Jalgaon Crime : तुकारामवाडीतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार