Jalgaon Mahanagar Palika : मनपाची कारवाई: सिंगल यूज प्लास्टिक आणि नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना दंड
हॅलो जनता न्युज, जळगाव :
मनपा (Jalgaon Mahanagar Palika) आरोग्य विभागाच्या पथकाने सोमवारी सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर आणि मिल्क सेंटरवर कारवाई केली. यासोबतच रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरीत नायलॉन मांजा विकणाऱ्या महिलेलाही दंड ठोठावण्यात आला. नायलॉन मांजा विक्री आणि सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असूनही, या वस्तूंचा सर्रास वापर आणि विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.
Jalgaon Mahanagar Palika : प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई
मनपाच्या पथकाने सोमवारी बळीरामपेठ आणि गांधी मार्केट परिसरात पाहणी केली. यावेळी संतोष महाजन आणि बॉम्बे मिल्क सेंटर येथे चार किलो सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या सापडल्या. या प्रकरणी दोघांनाही प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नायलॉन मांजावर मोठी कारवाई
रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी भागात हिराबाई सुभाष सोनवणे यांच्या घराची झडती घेतली असता, घरात नायलॉन मांजाच्या ११ लहान आणि चार मोठ्या चक्री सापडल्या. पथकाने त्वरित त्या जप्त करून हिराबाई यांना 5,000 रुपयांचा दंड केला.
Jalgaon Crime : तुकारामवाडीतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार
New Year Celebration : जळगाव : नववर्ष स्वागताला तयार, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर पोलिसांची करडी नजर