हॅलो राजकारण
Jalgaon Loksabha : शेतकरीपुत्र शेतकऱ्यांसाठी जळगाव लोकसभेच्या रिंगणात, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील देणार प्रस्थापितांना आव्हान…
हॅलो जनता (जळगाव) | (Jalgaon Loksabha) गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापित राजकीय पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या मताचा वापर करून घेत शेतकऱ्यांना फक्त मोठे मोठे आश्वासन देत आहेत मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला दिसत नाही त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आव्हान देण्यासाठी शेतकरी पुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून जळगाव लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
आज गुरुवार रोजी वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे, ता.एरंडोल, जि.जळगांव येथील दत्त मंदिरात शेतकरी नेते व अपक्ष उमेदवार निळकंठ पाटील यांनी लोकसभेच्या प्रचाराचे श्री दत्त मंदिरात नारळ फोडून आशीर्वाद घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या आवारात वसंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्याविषयी काँर्नर सभा घेतली.
येत्या २५ तारखेला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज
आज पासून उमेदवारी अर्ज मिळण्यास सुरवात झाली असून शेतकरी नेते नीलकंठ पाटील यांना शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद बघता येत्या २५ एप्रिल रोजी जळगाव येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तरी या दिवशी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.