Jalgaon : रेल्वेवर झालेल्या दगडफेकी नंतर खासदार स्मिता वाघ यांनी घेतली पोलिसांची भेट, दोषींवर कडक कारवाईची मागणी….
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगावच्या (Jalgaon) अमळनेर रेल्वे स्थानकाकडून नंदुरबार कडे जाणाऱ्या पॅसेंजर प्रवासी रेल्वे गाडीवर धार टेकडी जवळ अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकाराची दखल घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ नंदुरबार जाणाऱ्या पॅसेंजर वर चेन पुलींग करून रेल्वे थांबून त्यावर दगडफेक करण्यात आली होती.
अचानक झालेल्या दगडफेकीत प्रत्येक असणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या संदर्भातला व्हिडिओ हा समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध अमळनेर रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे विभागाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असे प्रकार होत असून या घटनेची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने अमळनेर येथे रेल्वे पोलीस विभागासोबत बैठक घेतली. दगडफेक करणाऱ्या गटाविरोधत कठोर कारवाई करण्याची खासदार स्मिता वाघ यांनी करत पोलिसांना देखील जाब विचारला आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाची बातमी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..