अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांची प्रचारात आघाडी, ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद..
हॅलो जनता न्युज, पारोळा –
एरंडोल पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकासाची कोणतीही कामे झाली नसल्याने मतदारसंघात आता परिवर्तन होणारच असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जनतेकडून मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांनी पारोळा एरंडोल मतदारसंघाचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे. तो विकास पुन्हा करून एरंडोल परवा मतदार संघ हा सुजलाम सुफलाम बनवण्याचा विडा जणू उचलला आहे.
एरंडोल पारोळा मतदार संघात वसंत सहकारी साखर कारखाना हा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे या साखर कारखान्यामुळे मतदार संघातील हजारो नागरिकांना रोजगार मिळाला होता याचा फायदा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना होत असल्याचे देखील होत होता मात्र राजकीय अनास्थ्यपोटी हा साखर कारखाना बंद पाडण्यात आला त्यामुळे हजारो नागरिकांना बेरोजगारी उपासमारीला सामोरे जावे लागले. मात्र जनतेने मला आशीर्वाद दिला तर मी सर्वप्रथम हा साखर कारखाना सुरू करेल असे आश्वासन डॉ. संभाजी राजे पाटील यांनी दिल्यामुळे नागरिकांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केलेला आहे.
अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान
Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार
Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत