IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर
हॅलो जनता न्युज, मुंबई :
IND vs ENG 2nd T20i : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात शानदार विजय मिळवला असून, 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधीच इंग्लंड क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये एक बदल करण्यात आला आहे, आणि एक नवीन खेळाडू संघात समाविष्ट केला आहे. इंग्लंड क्रिकेटकडून सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
इंग्लंडने गस एटकिन्सन याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर का ठेवले हे स्पष्ट केलं आहे. कोलकातामधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी गस एटकिन्सनचा चांगलाच समाचार घेतला होता. एटकिन्सनने 2 ओव्हरमध्ये 19 च्या इकॉनॉमी रेटने 38 धावा दिल्या, त्यामुळे त्याला पॅच मिळवला आहे. त्याच्याऐवजी ब्रायडन कार्स याला संघात स्थान मिळाले आहे.
ब्रायडन कार्सने आतापर्यंत 4 टी 20I सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या असून, त्याने 7.67 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे आता साऱ्यांचं लक्ष यावर आहे की, कार्सला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? तसेच, विकेटकीपर जेमी स्मिथ याचाही 12 खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याला संधी मिळणार की नाही, हे टॉस नंतरच स्पष्ट होईल.
IND vs ENG 2nd T20i : इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ (दुसऱ्या टी 20I साठी):
जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जेमी स्मिथ (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया (इंग्लंडविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी):
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”
धक्कादायक ! माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले
कवयित्री बहिणाबाई शासकीय संस्थेत नेताजी व बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न !