Big Breaking: भुसावळ मधून महाविकास आघाडीकडून दिनेश भोळे यांचे नाव चर्चेत?
हॅलो जनता, प्रतिनिधी
लवकरच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी कडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र त्या अगोदर कोणत्या पक्षाकडून कोण संभाव्य उमेदवार राहतील यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे रिंगणात असतील हे जवळपास निश्चित झाले असून महाविकास आघाडी कडून कुणाला उमेदवारी मिळेल या संदर्भात भुसावळ विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे हे महाविकास आघाडी कडून भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच डॉ. मानवतकर, प्रीती महाजन यांच्या देखील नावाची चर्चा आहे.
सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळे हे नेहमी सामाजिक कार्यात व्यस्त असून माहिती अधिकाराचा वापर करून गेल्या काही वर्षात शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मोठ्या भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत. त्यांनी कोरोना काळात काढलेल्या वैद्यकीय साहित्य खरेदी घोटाळा हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. त्यामुळे दिनेश भोळे यांना उमेदवारी मिळावी म्हणून जनता देखील आग्रही असल्याचे समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
Jain sports academy : जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन याला सुवर्ण