जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता, एस आर पी एफच्या पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त
हॅलो जनता, प्रतिनिधी – जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल या आरोपीला आरोपी पोलिसांनी १० दिवसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले आहे. यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली.
त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव शासकिय रुग्णालयात भरती करण्यात आले असून काही कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव – शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.
बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपीला ताब्यात देण्यासाठी प्रक्षुब्ध जमावाच्या उद्रेकानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जामनेरात रात्रीच एसआरपीच्या दोन तुकड्या दाखल झाल्या होत्या. जामनेर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रात्रीच पाठविण्यात आली आहेत. जामनेर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थीती नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
क्रिकेट विश्वावर शोककळा, टीम इंडियाच्या माजी क्रिकेपटूने चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या…
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती
संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी