कृषी विभाग अलर्ट : जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….
हॅलो जनता (जामनेर) – जामनेर येथील कृषी विभागाच्या पथकाने फत्तेपूर येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे तपासणी करण्यात आली. यात काही विक्रेत्यांकडे अनियमितता आढळून आल्याने सहा दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीत फसवणूक होऊ नये, त्यांना निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जळगाव जिल्हा कृषी विभागाकडून जिल्हा कृषि अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात पथके नेमून कारवाई सुरू आहे.
अचानक भेट देत तपासणी करीत आहे. दुकानांतील उपलब्ध स्टॉक तपासणी करण्यात येत असून काही ठिकाणी निविष्ठांचे नमुने घेण्यात येत आहेत. रविवारी कृषी विभागाच्या जामनेर येथील पथकाने फत्तेपूर येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे तपासणी केली. यात काही विक्रेत्यांकड़े अनियमितता आढळून आली. सहा दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत खुलासादेखील मागविण्यात आला आहे.
या भरारी पथकात उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी अधिकारी पंचायत समिती राजू ढेपले, मंडळ कृषी अधिकारी सुभाष अहिरे यांचा समावेश होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….
BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….