बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या गणरायाची मान्यवरांच्या उपस्थितीत आरती.

हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा
पाचोरा : पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित गणेश आरतीला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेत आरती केली.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडूभाऊ दत्तात्रय चौधरी, नगरसेवक संजय चौधरी, नगरसेवक छोटू चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरतीनंतर उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि संस्कृतीची जपणूक करण्याचे आवाहन केले. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद कोळी, संस्थापक अध्यक्ष अविनाश चौधरी, पप्पू हिराला चौधरी, घनश्याम जगन महाजन, भैया राजेंद्र पाटील, शांताराम सोनवणे, सतीश मोतीलाल चौधरी, किरण चौधरी, गोलू चौधरी, शुभम लिंगायत, मुन्ना संजय चौधरी, छोटू सुरेश चौधरी, विनोद नाना पाटील यांच्यासह महिला मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या आरतीदरम्यान “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या जयघोषाने पंचमुखी हनुमान मंदिर परिसर दुमदुमून गेला.



