भडगाव शनैश्वर महाराज यात्रा उत्सवात जुगारचा कहर ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
भडगाव : शनैश्वर महाराज यात्रा उत्सव दरम्यान शनि अमावस्या व शनी जयंतीच्या पर्वकाळात मोठ्या उत्साहात यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध पालख्या, खेळण्यांची दुकाने, हलवाई व खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे संपूर्ण यात्रा परिसर गजबजून गेला होता.
विशेष म्हणजे, जुगार सुरू असताना काही नामांकित पोलीस कर्मचारी यात्रेत फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याऐवजी कथित हप्तेवसुली सुरू असल्याच्या चर्चेमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे यात्रेत कायद्याचा कोणताही धाक उरला नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
धार्मिक उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून भडगाव शहरातील जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



