भडगाव शहरात मुस्लिम समाजाचा संदल मोठ्या उत्साहात साजरा

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
या निमित्ताने भडगाव शहरातील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष रेखाताई प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लकीचंद पाटील यांच्यासह नगरसेवक विजयकुमार देशमुख, सय्यद इमरान अली, अतुल परदेशी, विजयकुमार भोसले, देवाजी हरी, शेख खलील, राहुल ठाकरे, मिर्झा अंजुम, समीक्षा पाटील, रंजनाबाई वाघ, करुणा देशमुख, किरण पाटील, योगिता येवले, वैशाली पाटील, ज्योती पाटील, कल्पनाबाई भोई, वैशाली महाजन आदींचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे कार्यक्रमास सामाजिक व राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
यानंतर हजरत दादा गुलाब अली शहा यांच्या दर्ग्यावर पुष्पगुच्छ अर्पण करून हिरवी चादर चढविण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज अली शहा, उपाध्यक्ष मुजाहिद शहा, सचिव नूर मोहम्मद शहा, संचालक जावेद शहा तसेच सदस्य हुसेन अली शहा, अशपाक शहा, आजगर शहा, तय्यब शहा आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने हिंदू–मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येत धार्मिक ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले. शांतता, बंधुता आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा हा संदल सोहळा भडगावच्या सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.
एकूणच, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम असलेला हा संदल सोहळा भडगाव शहरात उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.




