हॅलो राजकारण

भाजपला मोठा धक्का! निर्धार मेळाव्यात यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश होणार…

हॅलो जनता न्यूज पाचोरा – आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज संध्याकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे औचित्य साधून एक मोठा राजकीय उलथापालथ घडणार आहे. या मेळाव्यात राज्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्ह्यातील नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे ज्येष्ठ कायदे तज्ञ ॲड. योगेश पाटील उर्फ दादू वकील हे शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

भाजपमध्ये दीर्घकाळ कार्यरत राहून जनसंपर्क आणि कायदे विषयक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले दादू वकील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या कार्यशैलीवर आणि जनसंपर्काच्या दृष्टिकोनावर प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला पाचोरा-भडगाव मतदारसंघात मोठा बळ मिळणार असून भाजपला मात्र मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या निर्धार मेळाव्यासाठी पाचोरा शहर आणि परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी स्वागत कमानी, फलक, बॅनर लावण्यात आले आहेत. हजारो कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी आमदार किशोर पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमातून आगामी निवडणुकांसाठी शिंदे शिवसेनेची ताकद अधिक दृढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत या मेळाव्याच्या माध्यमातून मिळत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या…

🔴 ब्रेकिंग : ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे एकावन्न लाखांचा धनादेश

🚨 ब्रेकिंग : भडगाव बसस्थानकासमोर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचा खोळंबा नागरिकांचा संताप….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button