हॅलो राजकारण
Jalgaon Loksabha: बहिणाबाईंचा आशीर्वाद घेत जळगावचा सर्वांगीण विकास करण्याचा स्मिता वाघ यांचा निर्धार, जुन्या जळगावातील वाड्याला दिली भेट
हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे जतन करून ठेवल्या आहेत. बहिणाबाईंच्या ओव्या असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील त्या सतत प्रेरित करत असतात. त्यांचा आशीर्वाद घेवून जळगाव लोकसभा मतदरसंघांला देखील विकासाच्या मार्गाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी स्मिता वाघ यांनी केला.
भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी जुन्या जळगावातील बौद्ध विहार तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी जळगाव आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेशाम चौधरी, आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MVA Jalgaon : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!
Jalgaon Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाढता प्रतिसाद