हॅलो क्रीडा

Gautam Gambhir : टीम इंडियात फूट आणि तणाव ? ; गौतम गंभीरने दिले स्पष्टीकरण

हॅलो जनता न्युज, मुंबई :

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेआधी इंग्लंड क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या टी20 मालिकेत पराभव स्वीकारला आहे. रविवारी 2 फेब्रुवारीला टीम इंडियाने इंग्लंडवर 150 धावांनी विजय मिळवत 4-1 असा एकतर्फी विजय मिळवला. आता या दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, ज्यात 3 सामन्यांचा समावेश असेल. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे, तर इंग्लंडच्या कर्णधारपदी जोस बटलर आहे.

रोहित शर्मा आणि टीम इंडिया यासाठी बॉर्डर गावसकर ट्रॉफी संपल्यानंतर मायदेशातील पहिली एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियात असलेल्या फूट आणि ड्रेसिंग रुममधील तणावावर अनेक चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी या चर्चांवर स्पष्टता दिली आहे.

गंभीरने (Gautam Gambhir) सांगितलं, “हे खेळाडू एकमेकांसोबत खूप क्रिकेट खेळले आहेत. एक महिन्यापूर्वी अशी अनेक अफवा होत्या,” असं गंभीर हसत हसत म्हणाला. त्याने पुढे सांगितलं, “जेव्हा टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक असते, तेव्हा ड्रेसिंग रुमबाबत अशी अफवा पसरवली जातात. मात्र, जसं आमच्या कामगिरीत सुधारणा होऊ लागते, तसंच सर्व काही नियमित होतं,” असं गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलं.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्याचं आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं, जिथे टीम इंडियाच्या विजयाच्या नंतर गौतम गंभीर आणि इतर खेळाडूंनी एका संवादातून चर्चेत भाग घेतला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Union Budget 2025 : अर्थसंकल्पात 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी खुशखबर !

संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्लास्टिक मुक्त संक्रांत; पर्यावरणपूरक वाणाचे वाटप

Chhagan Bhujabal : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा ; छगन भुजबळांचे शरद पवारांवर तिखट आरोप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button