SEBI ची धडक कारवाई ; 15,000 वेबसाइट्स आणि आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवर बंदी
हॅलो जनता न्युज, मुंबई
SEBI ने 15,000 हून अधिक वेबसाइट्स आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सल्ला देणाऱ्या आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई केली
सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत चुकीचे सल्ले देणाऱ्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) ने कठोर पावले उचलली आहेत. SEBI ने 15,000 पेक्षा जास्त वेबसाइट्स आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर बंदी घातली आहे. यामुळे यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर बाजारातील सल्ल्यांवर अवलंबून असणाऱ्या गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
कारवाई का झाली?
SEBI च्या तपासात असे समोर आले आहे की, अनेक इन्फ्लुएन्सर्सनी कोणताही वैधानिक डिस्क्लेमर न लावता विशिष्ट स्टॉक्सची जाहिरात केली. त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी संबंधित कंपन्यांकडून पैसे स्वीकारून स्टॉक्स खरेदी करण्याचे सल्ले दिले. यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली आणि काही स्टॉक्सच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवल्या गेल्या. हा प्रकार बाजारातील नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने SEBI ने कारवाई केली.
अलीकडील प्रकरणे
SEBI ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध आर्थिक इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती आणि नसीरुद्दीन अन्सारी यांच्यावर बंदी घातली. नसीरुद्दीन अन्सारी हे त्यांच्या “Baao of Chart” या X (पूर्वी ट्विटर) अकाऊंटवरून शेअर खरेदी-विक्रीचे सल्ले देत होते. SEBI ने अन्सारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 17 कोटी रुपये एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा करण्याचे आदेश दिले, जे गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई म्हणून परत दिले जाणार आहेत. अन्सारी यांच्यावर 10 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे, तर त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रत्येकी 2 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांसाठी इशारा
या कारवाईमुळे गुंतवणूकदारांनी सोशल मीडियावर शेअर बाजाराबाबत मिळणाऱ्या सल्ल्यांकडे डोळसपणे पाहावे आणि योग्य तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी, असा इशारा दिला गेला आहे. SEBI च्या या निर्णयामुळे शेअर बाजारातील दिशाभूल करणाऱ्या लोकांवर नक्कीच अंकुश येईल.
Jalgaon MIDC : एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान
Jalgaon Crime : घरमालकांच्या विश्वासाला तडा: मोलकरणीने २० लाखांची चोरी करून घेतले फ्लॅट व दुचाकी
Accident : “भरधाव दुचाकीची धडक: जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी यांची प्रकृती गंभीर”