काँग्रेस पाचोऱ्याच्या जागेवर ठाम, मुंबईत मोठी खलबते सुरू…
हॅलो जनता न्युज (मुंबई)
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्ष लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. मात्र त्या अगोदरच पाचोरा भडगाव मतदार संघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असल्याचे पाहायला मिळाला आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या वर्षभरापासून विधानसभेचे तयारी करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी तयारी देखील सुरू केली आहे. पाचोरा भडगाव मतदार संघातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी ही जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आग्रही असून मुंबईत तळ ठोकून बसल्याची माहिती समोर आली आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघात गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. मात्र शिवसेनेच्या फुटी नंतर विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाचोरा भडगाव मतदार संघाची जागा ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी लढवणार यावर ठाकरे सेना ठाम आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा शिवसेनेकडे असल्याने पक्ष फुटी नंतर ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांकडे केली जात आहे.
स्वातंत्र्यापासून या मतदारसंघात काँग्रेसच्या माध्यमातून शाश्वत विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे जनतेतून ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी जोरदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाचोरा भडगाव मतदार संघाची जागा ही काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही असून मुंबईत यासंदर्भात मोठी खलबते सुरू आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून ही जागा कोणत्या पक्षाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
भुसावळच्या आमदारांचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, भुसावळ तालुक्यातील अनेक गावे पोकरा योजनेपासून वंचित
Big Breaking : जामनेरात दिलीप खोडपे ऐवजी माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात…
3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल