सावधान ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने हळहळ…..
हॅलो जनता, प्रतिनिधी –
राज्यभरात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरु असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दांडिया गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेत गरबा दांडिया खेळत असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गरबा खेळताना लखन वाधवाणी नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दांडिया प्रेमींमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाचोरा शहरातील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनी परिसरातील रहिवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी वय २६ वर्षे हा दांडिया खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली अन त्याला चक्कर आले. त्यानंतर त्याला तत्काळ जवळील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळालं नाही. लखनच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरल्यानंतर सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबाचा आक्रोश…
लखन वाधवानी हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. त्याच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून तो चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आमदार किशोर पाटलांनी घेतली कुटुंबाची भेट घेत केली आर्थिक मदत….
या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी लखन च्या कुटुंबाची भेट घेत त्यांच्या सात्वन केले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून आमदार किशोर पाटील यांनी मयताच्या कुटुंबाला २ लाख रुपयाची आर्थिक मदत देवू केली आहे. तसेच सर्व दांडिया प्रेमींनी गरबा दांडिया खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
भडगाव तालुक्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद
Big Breaking: भुसावळ मधून महाविकास आघाडीकडून दिनेश भोळे यांचे नाव चर्चेत?
Jain sports academy : जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन याला सुवर्ण