MJ College Jalgaon : एम. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून घेतली स्वच्छतेची शपथ…
हॅलो जनता, जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव (MJ College Jalgaon) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सेवा ही स्वच्छता या मोहिमे अंतर्गतव्याख्यान आयोजीत केले होते. तसेच मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या तत्वानुसार विद्यार्थ्यांना शंभर तास स्वच्छता करण्याची शपथ देण्यात आली. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दिनेश पाटील जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणामधून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. अनिल बारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.विशाल देशमुख सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, डॉ. अखिलेश शर्मा व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री भिरुड तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….