विद्यमान आमदारांनी मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले आहे, सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका…
हॅलो जनता, प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार फक्त प्रचारात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी टीका शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातील जारगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या.
शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान, खडकदेवळा-लोहटार जिल्हा परिषद गटाचा शेतकरी मेळावा जारगाव येथे आयोजित केला होता. त्यात राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ज्ञ प्रा. सुदामसिंग राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघात फिरत आहे.
सर्वसामान्यांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तात्यासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी हा मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले तर मी सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी मी कटीबध्द आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. गिरणेवरील बंधाऱ्यांसाठी कुणीही प्रयत्न करत नाही. नदीतून बेसुमार वाळू उपसा झाल्याने गिरणा काठ उध्वस्त झाला आहे.
मेळाव्याला रमेश बाफना, राजेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, ॲड.अभय पाटील, संतोष पाटील, बाळु अण्णा, गजू पाटील, शरद पाटील, योजनाताई पाटील, मनीषा पाटील, बेबाताई पाटील, उषाताई परदेशी, गायत्री पाटील, मुकेश पाटील, सुरेखा वाघ, शशी बोरसे, प्रमोद नाना पाटील, तिलोत्तमा मौर्य, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र राणा, अनिल सावंत आदींची उपस्थिती होती.
इतर महत्वाच्या बातम्या…
274 सुशिक्षित युवकांना मिळाला आधार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप…